मराठीजनांनो, तुमच्यासाठी आता `मराठी स्पेलचेकर`!

संगणकावर आपण बेछूटपणे इंग्रजी टाईपिंग करतो कारण तिथं एखादं जरी स्पेलिंग चुकलं तरी ते लगचेच लाल रेषेनं अधोरेखित केलं जातं. पण मराठी टाईपिंग करताना मात्र ही उणीव भासते.

Updated: Mar 2, 2014, 11:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संगणकावर आपण बेछूटपणे इंग्रजी टाईपिंग करतो कारण तिथं एखादं जरी स्पेलिंग चुकलं तरी ते लगचेच लाल रेषेनं अधोरेखित केलं जातं. पण मराठी टाईपिंग करताना मात्र ही उणीव भासते.
मातृभाषेतून मराठीतून शिकलेल्यांचीही बऱ्याचदा ऱ्हस्व आणि दीर्घ यांची अडचण जाणवते. मात्र, ही अडचण सुनील खंडबहाले यांनी आता दूर केलीय.
संगणक क्षेत्रात त्यांनी एक नवीन पहिली `मराठी ऑनलाईन डिक्शनरी` तयार केलीय. त्यामुळे आता निदान बिनचूक मराठी लिहिता येणार आहे. अशा नवीन क्रांती घडवणाऱ्या प्रोग्रामचे नाव `मराठी स्पेलचेकर`...
वर्ड, एक्सल आणि अशा इतर सॉफ्टवेअरमध्ये काम करताना मराठी टाईपिंग आपण युनिकोड आणि इतर फॉन्टमध्ये करतो. पण, यात मात्र इंग्रजीप्रमाणे शुध्दलेखन आणि व्याकरणातील चुका दुरुस्त करण्याची सोय याआधी उपलब्ध नव्हती, असं सुनील खंडबहाले सांगतात.
ही बाब लक्षात घेऊन मी स्पेलचेकर बनवण्याचे ठरवलं, हे स्पेलचेकर बनवायला दोन वर्षांचा कालावधी लागला आहे... असंही खंडबहाले यांनी म्हटलंय.
मराठी स्पेलचेकर सध्या काही व्यक्तींनाच वापरता येणार आहे... मात्र, काही दिवसांनी हे सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. स्पेलचेक हे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट या सॉफ्टवेअरमध्ये वापरता येणार आहे.
त्यामुळे मराठी टाईपिंगमध्ये शुध्दलेखन आणि व्याकरणाचा चुकीचा शब्द लाल रेषेने अधोरेखित होणार आहे. त्यावर राईट क्लिक करुन योग्य शब्द दिसेल, अशा पद्धतीने चुकीचा शब्द सुधारता येईल.
स्पेलचेकर एकदा का डाऊनलोड केलं की, वर्ड ओपन करताच मराठी टाईपिंगसोबतच अॅक्टिव्ह होणार आहे. त्यासाठी कोणतीही सॉफ्टवेअर वर्डबरोबर चालू करावे लागणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.