`यू ट्यूब`वर व्हिडिओ पाहायचाय तर पैसे भरा!

यूट्यूबवर मोफत व्हिडिओ पाहण्याची हौस तुम्हाला लवकरच आवरती घ्यावी लागणार आहे. कारण यूट्यूबच लवकरच त्याच्या दर्शकांकडून पैसे वसूली करणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 8, 2013, 11:51 AM IST

www.24taas.com, मुंबई
यूट्यूबवर मोफत व्हिडिओ पाहण्याची हौस तुम्हाला लवकरच आवरती घ्यावी लागणार आहे. कारण यूट्यूबच लवकरच यूजर्सकडून पैसे वसूली करणार आहे.
आता येत्या काही आठवड्यापासून यूट्यूबने त्याच्या यूजर्ससाठी सबस्क्रिप्शन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार यूट्यूबवर कार्यरत असलेले ५० चॅनलन्स बघण्यासाठी किमान दोन डॉलर म्हणजे सव्वाशे रूपयाचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. त्याबरोबरच जे या वेबसाईटचे सबस्क्रायबर्स असतील त्यांना यूट्यूबवर एक्‍सक्लुझिव्ह व्हिडिओ पाहण्याची मुभा मिळू शकेल.

यूट्यूब आपल्या लॉन्चिगपासूनच व्हिडिओ यूजर्ससाठी मोफत सेवा पुरवित होता. त्यामध्ये व्हिडिओ बघायला पैसे भरावे लागत नसत. आत्तापर्यंत यूट्यूबवर व्हिडिओ बघायला किंवा व्हिडिओ अपलोड करायला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावं लागत नव्हतं. म्हणजे यूट्यूबवर कोणीही व्हिडिओ बघू शकत होतं किंवा फ्रीमध्ये व्हिडिओ अपलोडही करू शकत होतं, त्यासाठी आतापर्यंत या वेबसाईटने त्याच्या यूजर्सवर कोणतेही नियम लादले नव्हते. यामुळेच यूट्यूबला खूप प्रसिध्दिही मिळाली होती.