जखमा भरून काढणारी प्लास्टिकची त्वचा

आपल्याला एखादी जखम झाल्यास आपल्या शरीरावर त्याचे व्रण राहातात. ते बरे होण्यसाठी काही दिवस लागतात. मात्र आता शास्त्रज्ञांनी प्लास्टिकची त्वचा निर्माण केली आहे. ही त्वचा शरीरावरील कुठलीही जखम अर्ध्या तासांत भरून काढते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 13, 2012, 11:27 AM IST

www.24taas.com, कॅलिफोर्निया
आपल्याला एखादी जखम झाल्यास आपल्या शरीरावर त्याचे व्रण राहातात. ते बरे होण्यसाठी काही दिवस लागतात. मात्र आता शास्त्रज्ञांनी प्लास्टिकची त्वचा निर्माण केली आहे. ही त्वचा शरीरावरील कुठलीही जखम अर्ध्या तासांत भरून काढते.
स्टेनफोर्ड विद्यापीठातील झेनॉन बाओ यांच्या अध्यक्षतेखाली संशोधकांच्या एका ग्रुपने ही प्लास्टिकची त्वचा तयार केली आहे. यासाठी सिंथेटिक मटेरिअलचा वापर केला गेला आहे. नव्या त्वचेसाठी प्लास्टिक पॉलिमरचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
या संशोधनाबद्दल सांगताना बेंजामिन ची केआँग म्हणाले, “या त्वचेसाठी वेगळ्या विद्युत वाहकाची गरज नाही. प्लास्टिक पॉलिमरपासून बनवलेली त्वचा स्वतःहूनच विद्युतवाहकाची कामगिरी बजावते. त्यामुळे जखम झालेली त्वचा केवळ अर्ध्या तासात पूर्ववत होते.”