www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्मार्टफोनच्या बाजारात सँमसंगने चांगलीच बाजी मारली असून, आता सँमसंग टॅबलेट बाजारात उतरवणार आहे. कंपनीचा लवकरच गॅलेक्सी टॅब ४ बाजारात येतोय.
कंपनी टॅब ४ ची तीन सिरीज लाँन्च करणार आहे. ज्यामध्ये गॅलेक्सी टॅब४ ७.०, गॅलेक्सी टॅब४ ८.० आणि गॅलेक्सी टॅब४ १०.०१ सिरीज रिलीज होईल.
२०१४ च्या मध्यावर सँमसंग टॅब ४ लाँन्च करेल. मात्र कंपनीने अजून किंमतीचा खुलासा केला नाहीय.
गॅलेक्सी टॅब ४ ची वैशिष्ट्य:
सँमसंग टॅब ४ च्या तिन्हीही सिरीजमध्ये जवळपास सामान्य फीचर्स आहेत. सर्व टॅब ४.४ किटकॅट आहेत. टॅबमध्ये १.२ जीएचझेड क्वाड-कोर प्रोसेसर आणि १.५ जीबी रॅम आहे. त्याचबरोबर टॅबमध्ये ३ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि १.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असेल. टॅबची स्क्रीन १०.२ इंच असून ३जी सेवासुद्धा आहे.
काय आहे या टॅबमध्ये :
स्क्रीन : डब्लूएक्सजीए (१२८०X८०० रिझोल्यूशन)
वाय-फाय : ८०२.१ १एन
ब्लूटुथ : ४.०
मेमरी : ७.० टॅबमध्ये ८ जीबी आणि १६ जीबी इनबिल्ट मेमरी आहे. जी ३२ जीबीपर्यंत वाढवता येईल. ८.० आणि १०.०१ टॅब४ मध्ये १६जीबी इनबिल्ट मेमरी आहे आणि ती मायक्रो एसडी कार्डने ६४ जीबी पर्यंत वाढवता येईल.
बॅटरी :
१०.१ टॅब४ मध्ये ६८०० एमएएच बॅटरी आहे. तर ७.० आणि ८.० टॅब४ मध्ये ४४५० एमएएच बॅटरी आहे.
कलर :
हा टॅब काळा अणि पांढरा कलरमध्ये उपलब्ध आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.