www.24taas.com,बर्लिन
सॅमसंगने गॅलेक्सी नोट-२ बाजारात दाखल झाला आहे. बर्लिनमध्ये आयोजित युरोपमधील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक शोमध्ये हे सॅमसंगच नवीन उत्पादन दिसू लागले आहे. गॅलेक्सी नोट-२ हा सॅमसंगचा आत्तापर्यंतचा सर्वात स्मार्टफोन आहे.
गॅलेक्सी नोट-२ मध्ये ८ मेगापिक्सल कॅमेरा आहे. ह्या फोनमध्ये ३ जी बरोबरच ४ जी सपोर्टसुद्धा आहे. तसंच एस-वायस जसे फीचर्ससुद्धा यात आहेत. या फॅब्लेट फोनची तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत. १६ जीबी, ३२ जीबी आणि ६४ जीबी. १६ जीबी आणि ३२ जीबी व्हर्जन्सची क्षमता ६४ जीबी पर्यंत वाढवण्याची व्यवस्था आहे.
या स्मार्टफोनमध्ये अॅन्ड्रॉइड ४.१ आहे. तसेच तुम्ही अगदी पेन पेन्सिलसारखं हुबेहूब लिहू किंवा रेखाटू शकता. सॅमसंग गॅलेक्सी नोट-२ हा युरोप आणि आशियातील बाजारात ऑक्टोंबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र, या स्मार्ट नोटची किंमत सांगण्यात आलेली नाही.