‘सॅमसंग टॅब - 3’ भारतात लाँच

मोबाईल मार्केटमध्ये सॅमसंगने आपला दबदबा निर्माण केलाय. टॅबच्या दुनियेत एक पाऊल पुढे टाकत सॅमसंगचा नवीन टॅब ३ बाजारात दाखल झालाय

Updated: Jul 19, 2013, 12:28 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
मोबाईल मार्केटमध्ये सॅमसंगने आपला दबदबा निर्माण केलाय. टॅबच्या दुनियेत एक पाऊल पुढे टाकत सॅमसंगचा नवीन टॅब ३ बाजारात दाखल झालाय. सॅमसंगने गॅलॅक्सी टॅब २नंतर आता सॅमसंग गॅलॅक्सी टॅब ३ भारतात लाँच केलाय.
सॅमसंग टॅब ३ हा सात इंच आणि आठ इंच या दोन आकारात उपलब्ध आहे. सात इंचाचा वाय फाय आणि ३जी असलेला टॅब १७,७४५ रुपयांना, आठ इंचाचा ३जी टॅब २५,७२५ रुपयांना आणि आठ इंचाचा फक्त वायफाय असलेला टॅब २१,९४५ रुपयांना मिळेल. या टॅबची विक्री रविवार २१ जुलैपासून सुरु होणार आहे.
सॅमसंगने सात इंचाच्या टॅबला गॅलॅक्सी टॅब ३ टी२११, ८ इंचाचा ३जी वाला टॅबला गॅलॅक्सी टॅब ३ टी३११ आणि ८ इंचाचा वायफाय टॅबला गॅलॅक्सी टॅब ३ टी३१० ही नावे देण्यात आली आहेत.
गॅलॅक्सी टॅब ३ टी३११ आणि टी३१० ची वैशिष्ट्ये
१२८०X८०० पिक्सेल रिझोल्यूशन
१.५ गिगाहर्टझ ड्यूअल कोअर प्रोसेसर
१.५ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज
६४ जीबी एक्स्पांडेबल मेमरी, ४.२ अँड्रॉइड
५ मेगापिक्सेल कॅमेरा, १.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
४४५० एमएएच बॅटरी
गॅलॅक्सी टॅब ३ टी२११ची वैशिष्ट्ये
१०२४X६०० पिक्सेल रिझोल्यूशन
१.२ गिगाहर्टझ ड्यूअल कोअर प्रोसेसर
१ जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज
३२ जीबी एक्स्पांडेबल मेमरी, ४.१ अँड्रॉइड सिस्टम
३ मेगापिक्सेल कॅमेरा, १.२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
४००० एमएएच बॅटरी

सॅमसंगने वोडाफोनशी एक करार केलाय ज्यात टॅब-३च्या दोन्ही व्हर्जन्सवर २ महिन्यांपर्यंत प्रत्येकी २जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.