सोनीचा Xperia Z2 लवकरच बाजारात

मोठ्या स्क्रीन साईजचा आणि दमदार हार्डवेअर असलेला सोनीचा आणखी एक स्मार्टफोन बाजारात येणार आहे. कंपनी भारतीय बाजारात 8 मे रोजी लॉन्च करणार आहे.

Updated: May 5, 2014, 03:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोठ्या स्क्रीन साईजचा आणि दमदार हार्डवेअर असलेला सोनीचा आणखी एक स्मार्टफोन बाजारात येणार आहे. सोनीचा Xperia Z2 हा फोन भारतीय बाजारात 8 मे रोजी लॉन्च होणार आहे.
हा फोन 5.2 इंच स्क्रीन असलेला, तसेच 20.7 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला 4 जी फोन आहे. या फोनची किंमत 55 हजार रूपयांच्या जवळपास आहे.
Z2 च्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर हा फोन पाणी आणि डस्ट प्रुफ आहे. या फोनला 1.5 m पाण्यात 30 मिनिटंही ठेवलं तरी या फोनवर कोणताही परिणाम होणार नाही. हा फोन एंड्रायड 4.4 किटकॅटवर काम करतो, तसेच या फोनमध्ये 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज क्षमता आहे.
दमदार प्रोसेसिंग स्‍पीड
सोनीचा Xperia Z2 हा फोन प्रोसेसिंग स्पीडबाबत अनेकांना टक्कर देणारा आहे. या फोनमध्ये क्वाड कोर 801, Qualcomm Snapdragon प्रोसेसर आहे. या फोन 3 जीबी रॅम असल्याने स्पीडही चांगला मिळणार आहे.
सोनी Xperia Z2 ची माहिती
डिस्‍प्‍ले- 5.2 inch (1920 x 1080p)
एंड्रॉएड- 4.4 kitkat
प्रोसेसर- 801 Qualcomm Snapdragon (MSM8974AB) क्‍वाड कोर
हार्डवेअर- 2.3GHz Adreno 330 GPU
रॅम- 3GB
स्‍टोरेज- 16GB इंटरनल, माइक्रो एसडी कार्डच्या मदतीन 64GB वाढवता येऊ शकते
कॅमरा- 20.07 MP रियर, 2.2 MP फ्रंट कॅमेरा
फोकस- ऑटो फोकस
व्हिडियो शूट- 2160p(4K) videos@30fps रिअर कॅमेरा
इंटरनेट कनेक्टिव्ह- 4G, 3G, Wi-Fi, GPS
ब्‍लूटूथ- 4.0
बॅटरी- 3200 mAh (नॉन रिमूव्हेबल)
टॉकटाइम- 19 घंटे
किंमत- 55 हजार रुपये

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.