www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील कॉलेज मधील प्रवेशांसोबतच इंजिनीरिंग च्या प्रवेश प्रक्रियेलाही वेग आलाय. मात्र ओबीसी कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी आवश्यक असणारं नॉन-क्रिमिलीअर दखले अजून न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागलाय.
अशातच शनिवारी दिवसभर पुण्यातील नागरी सुविधा केंद्रच बंद राहिल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप दिसत होता.. अभियांत्रिकी प्रवेशासाठी सोमवार पर्यंत नॉन-क्रिमिलिअर दखले जमा करण्याची अंतिम मुदत आहे मात्र दोन महिने आधी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाही अद्याप मिळालेले नाहीत.
अशातच शनिवारी केंद्र सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यामुळे शनिवारी मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी नागरी सुविधा केंद्र बाहेर जमा झाले होते. मात्र केंद्राच बंद राहिल्याने नॉन - क्रिमिनल दाखला जमा करण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विद्यारही करत होते..
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.