आता, व्हॉटस्अपला बाय-बाय...

‘व्हॉटस्अप’ सारखंच आणखी एक अॅप्लिकेशन अँन्ड्रॉईड आणि आयओएस मोबाईलसाठी उपलब्ध झालंय. ‘व्हॉटसअप’ प्रमाणेच फिचर्स असूनदेखील हे अॅप्लिकेशन या आणि इतर अॅप्सपेक्षा वेगळा ठरतो...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 30, 2014, 05:14 PM IST

zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘व्हॉटस्अप’ सारखंच आणखी एक अॅप्लिकेशन अँन्ड्रॉईड आणि आयओएस मोबाईलसाठी उपलब्ध झालंय. ‘व्हॉटसअप’ प्रमाणेच फिचर्स असूनदेखील हे अॅप्लिकेशन या आणि इतर अॅप्सपेक्षा वेगळा ठरतो... कारण, या अॅप्लिकेशनचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘डाटा सिक्युरिटी’...
हे अॅप्लिकेशन म्हणजे ‘टेलिग्राम’... कोणत्याही अँन्ड्राईड मोबाईलवर तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करून वापरता येऊ शकतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या अॅपद्वारे तुम्ही शेअर केलेली कोणतीही फाईल, फोटो, व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या डिव्हाईसवर पाहू शकाल. तसंच वन जीबीपर्यंतच्या फाईल याद्वारे तुम्ही सहज ट्रान्स्फर करू शकाल. तसंच या अॅपमध्येही तुम्ही तुमचा ग्रुप बनवू शकाल... आणि एकाच वेळी जास्तीत जास्त २०० जणांना तुम्ही या ग्रुपमध्ये सहभागी करू शकता.
यामध्ये तुम्हाला ‘सिक्रेट चाट’चाही ऑप्शन उपलब्ध आहे. तुम्ही एकमेकांशी शेअर केलेला डाटा क्लाऊडवर सेव्ह होतो. त्यामुळे तो सुरक्षित राहतो आणि मुख्य म्हणजे यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
मात्र, या अॅपमध्ये व्हॉईस मॅसेजेस पाठवण्याची सोय उपलब्ध नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.