www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नोकियाने बाजारात पुन्हा एकदा नव्याने फोन लाँच केला आहे. आशा सिरिजचा ५०१ मोबाईल आज नोकियाचे सीईओ स्टीसफन इलॉप यांनी दिल्लीपमध्येए लाँच केला. आणि या मोबाईलची किंमत ५३०० इतकी आहे. फेसबुकबरोबर करार असल्यामुळे ज्याक युजर्सकडे एमटीएनएल आणि एअरटेलची सेवा आहे, त्यांना मोफत फेसबुकची मजा लुटता येईल, अशी माहिती स्टीबफन इलॉप यांनी दिली.
नोकियाने आशा ५०१चे डिझाईन आपला हायएंड फोन ल्युयमियाच्याम धर्तीवर तयार केला आहे. याचा लुक आणि फिचर्सही ल्युयमियाशी मिळता-जुळता आहे. डिझाईन एकदम कॉम्पॅ क्टर आणि क्लिन ठेवण्याेत आला आहे.
फोनचे कन्सशट्रक्शळन टू-पार्ट मोनोबॉडी आहे. नोकियाने आशा ५०१ला ब्राईट रेड, ब्राईट ग्रीन, स्वायन, पिवळा, पांढऱ्या आणि काळया रंगात लाँच केला आहे. युवापिढीला आकर्षित करण्याेसाठी नोकियाने लाल रंगाचा हेडफोन दिला आहे.