'किंग ऑफ बॅड टाइम्स' माल्ल्या व्हॉट्सअॅपवर हिट...

मुंबई : देशभरातल्या बँकांची कर्ज बुडवून युरोपात निघून गेलेला 'किंग ऑफ गूड टाइम्स' विजय माल्ल्या सध्या व्हॉट्सअॅपवर मात्र जाम हिट झालाय. 

Updated: Mar 15, 2016, 11:34 AM IST
'किंग ऑफ बॅड टाइम्स' माल्ल्या व्हॉट्सअॅपवर हिट... title=

मुंबई : देशभरातल्या बँकांची कर्ज बुडवून युरोपात निघून गेलेला 'किंग ऑफ गूड टाइम्स' विजय माल्ल्या सध्या व्हॉट्सअॅपवर मात्र जाम हिट झालाय. त्याच्या नावाच्या मॅसेजनी व्हॉट्सअॅपवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

विजय माल्ल्या यांनी देशातील १० पेक्षा जास्त बँकांचे ७००० कोटीपेक्षा जास्त पैसे बुडवले आहेत. त्यामुळे सध्या सर्वच यंत्रणा त्यांच्या मागे हात धुऊन लागल्यायत. पण, माल्ल्या मात्र कधीच देश सोडून पळून गेलेत.
 
अर्थातच, सोशल मीडिया आणि व्हॉटसअपवर या विषयावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या... काहींनी सरळसोटपणे यावर टीका केलेली पाहायला मिळाली तर काहींनी आपल्या मजेशीर मॅसेजेसमधून... सध्या व्हॉटसअप आणि सोशल मीडियावर दिसणाऱ्या या काही मजेशीर प्रतिक्रिया... 

- 'विजय माल्ल्यांनी बुडवलेले पैसे वसूल करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर केलेल्या प्रत्येक विनोदावर सरकारतर्फे ६ रुपये अधिभार लावण्यात येईल.'

- 'कोणाला व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडायचे असल्यास सरळ सांगून निघून जावे. उगीच विजय माल्ल्यांसारखे गुपचूप जाऊ नये.'

- 'आज एटीएमधून पैसे काढायला गेलो तर पैशांऐवजी केवळ पावती आली. त्यावर लिहिलं होतं - तुमचे पैसे विजय माल्ल्या घेऊन पळालाय.'

- 'काळा पैसा परत येणं तर सोडाच, पण, विजय माल्ल्या देशाचं ७००० कोटींचं पांढरं धन घेऊन पळालाय. नेते कन्हैया कन्हैया खेळत बसल्यावर आणखी काय होणार?'

- विजय माल्ल्या सरकारला म्हणतात 'देतो ना पैसे... पळून जातो काय?'