www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मायक्रोमॅक्स आपल्या स्मार्ट फोनवर जाहिरात पाहण्याच्या बदल्यात पैसे देणार आहे.
ही योजना मायक्रोमॅक्सचा आगामी फोन मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस मॅड सोबत लागू होणार आहे.
यासारखा प्लान या आधी टाटा डोकोमोने आणला आहे.
ट्विटर अकाउंट @MMXNewscaster वर याबाबतीत माहिती देण्यात आली आहे, की मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस मॅड (A94) लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.
या फोनची किंमत फार कमी असणार आहे. तसेच या फोनवर जाहिराती पाहणाऱ्याला त्या बदल्यात पैसे मिळणार आहेत.
`द हिंदू` या इंग्रजी दैनिकानेही याबाबतीत माहिती देतांना म्हटलं आहे की, मायक्रोमॅक्स आपली इंटरनल ऍडव्हटायझिंग एजन्सीही सुरू करणार आहे.
लोकांना जाहिराती पाहण्याचे पैसे मिळणार आहेत, आणि हे पैसे रिचार्ज करण्यासाठीही कामात येणार आहेत. मात्र या पैशांचं प्रमाण कसं आणि किती असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
मात्र कोका-कोला आणि तोशिबा कंपनीशी याविषयी करारही झाला आहे. कंपनीचे को फाऊंडर राहुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार २० जानेवारीपासून ही सेवा सुरू होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.