www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल मीडिया आणि स्मार्टफोन्समधून नव नवं तंत्रज्ञान लोकप्रिय होत असतं. मात्र या तंत्रज्ञानामुळे अनेक व्याधीही जडत असल्याचं दिसून येत आहे. मुंबई मनपातील भाजपचे गटनेते दिलीप पटेल यांना निद्रानाश झाला आहे. डॉक्टरांनी याचं कारण व्हॉट्स अॅप असल्याचं सांगितलं आहे.
व्हॉट्स अॅपच्या सतत होणाऱ्या आवाजामुळे पटेल यांना निद्रानाश झाल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. चांगली झोप लागावी यासाठी व्हॉट्स अॅप काही दिवस बंद ठेवावा, असा सल्ला डॉक्टरांनी पटेल यांना दिला. हा सल्ला पाळल्यावर पटेल यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. व्हॉट्स अॅपच्या केवळ आवाजामुळेच निद्रानाश जडतो असं नाही, तर व्हॉट्स अॅपवर सतत येणारे मॅसेज, अपडेट्स यांची वाट पाहाण्याची मनाला सवय लागल्यामुळे निद्रानाश होतो, असं मानसोपचारतज्ज्ञांनी निदान केलं आहे.
फेसबुक किंवा व्हॉट्स अॅपवर नवनवे पोस्ट्स, अपडेटेड मॅसेजेस पाहाण्याची सवय झाल्यावर सतत काही वेळाने लक्ष व्हॉट्स अॅपकडे जाऊ लागतं. त्यामुळे रात्री झोपेतही व्हॉट्स अॅपवरचे मॅसेज चेक करत राहाण्याचं व्यसन जडून शकतं. यामुळे व्हॉट्स अॅपमुळे निद्रानाश होतो. हा सल्ला जरी दिलीप पटेलांसाठी असला, तरी, आजच्या टेक्नोसॅव्ही मोबाइल युजरर्सनीही याचा विचार करणं आवश्यक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.