www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कासव महोत्सवासाठी वेळास येथे आलेल्या पुणे येथील २० वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तो पोहण्यासाठी समुद्रात उतरला. मात्र, समुद्राचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
तेजस देवरावजी दुर्गे असे बुडालेल्या तरूणाचं नाव आहे. वेळास येथे कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव पाहण्यासाठी तो आपल्या काही मित्रांसोबत मंडणगड येथे आला होता.
पुजा देसाई, श्रेयस दुर्गे, मनिषा भगवनाणी, अमित भगवनाणी, देवेंद्र शिंदे, यशोधरा दस, गितांजली भगत, अमय भगत या आपल्या मित्रांसोबत तेजस पाण्यात उतरला. गुडघाभर पाण्यात पोहोचल्यानंतर लाटा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने यातील चार जण बुडालेत.
लाटा आणि पायाखालील बाळू घसरल्याने सर्व मित्र समुद्रात ओढले गेलेत. मात्र, ही बाब तिघांच्या लक्षात आल्याने त्यांनी अन्य मित्रांना पाण्याबाहेर काढले. परंतु लाटांचा तटाख्यात सापडल्याने तेजय बुडाला. या अपघातप्रकरणी बाणकोड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.