मित्रानेच रचला अपहरणाचा डाव

आम्ही पुणे क्राईम ब्रँन्चचे पोलिस आहोत तुमची चौकशी करायची आहे... असं जर, कुणी सांगत असेल तर जरा सावधान...कारण, अशी बतावणी करत तुमचं अपहरण होवू शकतं...आम्ही असं का म्हणतोय ते वाचा...

Updated: Nov 21, 2015, 07:14 PM IST
मित्रानेच रचला अपहरणाचा डाव title=

खेड : आम्ही पुणे क्राईम ब्रँन्चचे पोलिस आहोत तुमची चौकशी करायची आहे... असं जर, कुणी सांगत असेल तर जरा सावधान...कारण, अशी बतावणी करत तुमचं अपहरण होवू शकतं...आम्ही असं का म्हणतोय ते वाचा...

दापोलीतील रुपेश आणि अश्विनकुमार हे एकत्रित चिरेखाणीचा व्यवसाय करत होते...  मात्र काही वर्षापासून दोघांनी फारकत घेतली आणि वेगवेगळे व्यवसाय सुरु केले.  मात्र अश्विनकुमार यांच्या मनात रुपेशबद्दल राग होता. त्यामुळे रुपेशच काटा काढण्यासाठी त्याचे अपहरण करण्याची योजना अश्विनकुमारने आखली. दापोली जवळच्या गावतळे फाट्याजवळ बोलोरो गाडीतून रुपेश घरी परतत असताना त्याची अपहरणकर्त्यांनी त्यांची गाडी थांबवून आम्ही पुणे क्राईम ब्रँन्चचे पोलिस आहोत अशी बतावणी करत रुपेशचं अपहरण केल.

मात्र रुपेशचे दैव बलवत्तर होते. अपहरण आणि झटापट होताना गावातील रुपेशच्या जवळच्या व्यक्तीने पाहिले. त्यांनी रुपेशच्या भावाला फोन केला आणि याबाबतची माहिती दिली. रुपेशबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या भावाने झटपट दापोली पोलीस आणि खेड पोलिसांशी संपर्क साधला. खेड पोलिसांनीही तात्काळ नाकाबंदी करुन तासाभरात सहा अपहरणकर्त्यांना गजाआड केलं.

अपहरण करण्याआधी काही दिवस रुपेश यांच्या अपहरणात वापरलेली इनोव्हा गाडी रुपेश यांच्या ऑफिसच्या चकरा मारून पाळत ठेवून होती. मित्राचा काटा काढण्याचा डाव रचलेला अश्विनकुमार मोरे अजूनही फरार आहे. पुणे आणि मुंबईत पोलिस या अश्विनकुमारचा शोध घेतायत. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं मोठं अपहरणनाट्य उधळण्यात आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.