वाशी येथे बिल्डर्सची दिवसा गोळ्या घालून हत्या

वाशी येथे एस. के. बिल्डर्सचे प्रमुख सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिल्डर्सची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे मारेकरांना त्वरीत पकडण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जोपर्यंत मारेकऱ्यांना पकडत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सुनीलकुमार यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2013, 09:15 AM IST

www.24taas.com,नवी मुंबई
वाशी येथे एस. के. बिल्डर्सचे प्रमुख सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिल्डर्सची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे मारेकरांना त्वरीत पकडण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जोपर्यंत मारेकऱ्यांना पकडत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सुनीलकुमार यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.
बाईकवर आलेल्या दोन मारेक-यांनी कुमार यांच्या कार्यालयाबाहेरच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या कुमार यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्यांचे मृत्यू झाला.
एका लहान मुलाने दगड फेकून मारल्याने जखमी झालेला हल्लेखोर पोलिसांना सापडला. त्यामुळे कुमार यांच्यावर हल्ला करणा-यांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

सकाळी सव्वाआठच्या सुमारास दोन मारेकर्‍यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या केली. यातील व्यंकटेश शेट्टीयार (२८) या मारेकर्‍याला नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. हंटर सिक्युरिटीचा ड्रेस घातलेल्या दोन हल्लेखोरांनी प्राण घातक हल्ला केला.
वाशी सेक्टर २८ येथे हे कार्यालय आहे. सकाळी सुनीलकुमार नेहमीप्रमाणे त्यांच्या सकाळी ८.०० सेक्टर २८ येथील ब्ल्यू डायमंड चौकातील एस.के. बिल्डरच्या कार्यालयाजवळील बसस्टॉपजवळ हंटर सिक्युरिटीचा ड्रेस घातलेले दोन मारेकरी गाडी तेथेच पार्क करून उभे होते. सकाळी ८.२० रक्तबंबाळ झालेले सुनील कुमार प्रतिकार करीत असताना, दुसर्‍या मारेकर्‍याने त्यांच्यावर चॉपरने हल्ला चढवला. त्यानंतर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. सकाळी ८.१७ दबा धरून बसलेल्या मारेकर्‍यांपैकी एकाने त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात नारळाने जोरदार प्रहार केला.
सकाळी ८.३० हल्लेखोर पळ काढत असताना, कार्यालयातील काही कर्मचारी बाहेर आले. नागरिकांच्या मदतीने हल्लेखोर व्यंकटेश्‍वर शेट्टीयार याला पकडले.