www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यातील कळवा भागात आज रात्री पुन्हा एक इमारत कोसळली. पण, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती त्यामुळे इमारतीतील रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. त्यानंतरही या इमारतीत २५ कुटुंब रहात होते. मात्र, इमारतीचा पीलर सरकल्याचं इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानं दुर्घटना होण्यापूर्वीच त्यांनी इमारत सोडली. त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. केवळ दहा - पंधरा मिनिटांचा अवधी मिळाल्यामुळे रहिवाशांचा जीव वाचला.
जिवितहानी टळली असली तरी या इमारतीत वित्तहानी मात्र नक्कीच झालीय. ही इमारत ३० वर्षांपेक्षा जास्त जुनी होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.