www.24taas.com, झी मीडिया, रायगड
संयुक्त महाराष्ट्रासाठी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा बाणेदारपणा दाखवणाऱ्या सी. डी. देशमुख यांच्या अनेक दुर्मिळ गोष्टींचं स्मारक रोह्यात उभं राहीलंय. शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उदघाटन होणार आहे.
सी. डी. देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री तसंच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर... त्यांच्या सहीच्या या नोटा आज चलनात नसल्या तरी त्याच्या स्मृती मराठई माणसाच्या मनात आहेत. डॉ. देशमुख यांनी आपल्या सहीने पहिली नोट आईला दिली होती ती नोटही देशमुखांच्या संग्रहालयात उपलब्ध आहे, असं रोह्याचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांनी सांगितलंय.
महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा हा दुर्मिळ खजिना सापडला तो दिल्लीमध्ये... सी.डी. देशमुख यांच्या कुटुंबीयांचा, लग्नाचा फोटोही इथे उपलब्ध आहे. त्यांच्या लग्नाला स्वतः पंडीत नेहरू उपस्थित होते. त्यांनी केलेल्या कार्याची छायाचित्रं राज्य सरकारकडेही नाहीत. पण, रोहा नगर पालिकेने अतिशय परिश्रमपूर्वक ही छाय़ाचित्रं मिळवली आहेत. डॉ. देशमुखांना ज्यांनी जवळून पाहीलं त्यांच्यापैकी फार थोडे आज आपल्यात आहेत.
मराठी भाषेचं राजकाऱण अनेकांनी केलं. पण मराठीचा झेंडा आपल्या विद्वत्तेने अटकेपार रोवला त्या डॉ. सी. डी. देशमुखांचा राज्य सरकारला विसर पडला. मात्र, त्यांच्या जन्मगावी त्यांचं स्मारक उभारून त्यांचं काम नव्या पिढीला उपलब्ध करून देणाऱ्या रोहा नगरपरिषदेने मात्र फार मोलाचं काम करून ठेवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.