www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
डोंबिलवली जवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे मुंबईकडे नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, स्लो वाहतूनक फास्ट ट्रकवर वळविण्यात आली आहे. तोच काहीसा दिलासा मध्य रेल्वेने दिलाय.
ठाणे ते कल्याण दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसटीकडील स्लो ट्रॅकवरील वहतूक ठप्पच पडली आहे. कर्जत, कसारा आणि अंबरनाथच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. काही गाड्या डोंबिवली येथे थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे डोंबिवली येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
डोंबिवली येथे सकाळी ६.३० वाजता पेंटोग्राफ तुटल्याने स्लो ट्रकवरील वाहतूक बंद पडली. त्यामुळे सकाळी डोंबिवली स्थानकात प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. सुमारे १.३० तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला कार्यालयात पोहोचण्यास उशीर होणार असल्याने प्रवाशीवर्गातून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, कल्याणमध्ये रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. स्लो सेवा फास्ट ट्रकवर वळविण्यात आल्याने गाडीत चढण्यासाठी प्रचंड चढाओढ दिसून येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.