मध्य रेल्वेच्या 'कारभारा'मुळे कोकण रेल्वेच्या गाड्या उशीराने

रोहाच्या दिशेने जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्या उशीराने धावत आहेत. सेंट्रल रेल्वेचा पेण जवळ ब्लॉक सुरू असल्याने हा उशीर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Updated: May 15, 2014, 07:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पेणजवळ मध्य रेल्वेने काही कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकची वेळ अचानक वाढवल्याने त्याचा मोठा फटका मात्र कोकण रेल्वेला बसला. रोहाच्या दिशेने जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्या खोळंबणार आहेत, सेंट्रल रेल्वेचा पेणजवळ ब्लॉक सुरू असल्याने हा उशीर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून सीएसटीच्या दिशेने येणार्‍या अनेक एक्सप्रेस गाड्या जागीच थांबवण्यात आल्या. तब्बल तीन ते चार तास एक्स्प्रेस गाड्यांना थांबविण्यात आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. मध्य रेल्वेचे काम वेळेत पूर्ण न झाल्यानेच हा फटका बसल्याचे सांगण्यात आले. सावंतवाडी - दिवा या गाडीला कोलाडजवळ तब्बल तीन तास थांबवून ठेवण्यात आले.
या दुरूस्तीचं काम 12.40 ते 1600 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चालण्याची शक्यता आहे. तो किती वेळ लागले याची माहिती मध्य रेल्वेने दिली नसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला. मात्र, याचा त्रास प्रवाशांना झाला. 12431 राजधानी एक्स्प्रेसला 35 मिनिटं उशीर झाला. रोहा ते पनवेल तब्बल पाच तासांपेक्षा अधिक वेळ राजधानी एक्स्प्रेसला लागला.
50106 सावंतवाडी दिवा आणि 10104 मांडवी एक्स्प्रेस कोलाडला थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे सावंतवाडी 3 तास तर मांडवी एक्स्प्रेस1 तास 10 मिनिटं उशीर झाला.
12449 गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस माणगावला 2 तास, तर कोलाडजवळ 1 तास थांबवून ठेवण्यात आली होती. तर 16336 हापा एक्स्प्रेस वीरजवळ 2 तास उशीर झाला.
01004 हॉलीडे स्पेशल एक्स्प्रेसलाही कोलाडजवळ 2 तास थांबवून ठेवण्यात आले होते.
दरम्यान, रोहापासून मुंबईकडे येणार्‍या एक्सप्रेस गाड्यांना मध्ये रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे उशिर होत होता, असे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.