मुंबई: टीव्ही बघत असताना बहिणीनं वारंवार रिमोट हिसकावून घेतल्यानं चिडलेल्या एका 11 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली आहे. कल्याणमधल्या वालधुनी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
दुर्गेश सोनीच्या 12 वर्षांच्या बहिणीनं त्याच्या हातातून एकसारखा रिमोट हिसकावून घेतला आणि अभ्यासाचं पुस्तकही फाडलं, त्यामुळे दुर्गेशनं बेडरुममध्ये गळफास लावून घेतला.
दुर्गेशची आई कामानिमित्त बाहेर गेली असताना त्यानं आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.