हत्या प्रकरणी : राष्ट्रपती पदक विजेत्याला अटक

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला अटक करण्यात आलीय. रविवारी या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2013, 01:00 PM IST

www.24taas.com,नवी मुंबई
नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला अटक करण्यात आलीय. रविवारी या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बिल्डर सुनीलकुमार यांची शनिवारी सकाळी वाशीच्या सेक्टर २८ मध्ये अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी पकडण्यात आलेला मारेकरी व्यंकटेश शेट्टीयार याने अमोलिक यांचे नाव घेतले होते. त्याच्या माहितीवरुनच नवी मुंबई पोलिसांनी अमोलिक याला अटक केली. ४० एनकाऊंटर केले आहेत. तो राष्ट्रपती पदक विजेता आहे.
याच मारेक-याने शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांचेही नाव घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. ही हत्या सुनीलकुमारच्या विरोधकांनी केली असल्याचा आरोप सुनीलकुमार यांच्या कुटुंबियांनी केलाय. सर्व आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत सुनीलकुमार यांचा अंत्यविधी करणार नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय.

नवी मुंबईत रियल इस्टेट क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या हत्यांमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडालीए. गेल्या तीन महिन्यात या क्षेत्रात काम करणा-या एजन्ट आणि सिडको अधिकारी आणि बिल्डरांचा बळी घेतलाय. तर अनेकवेळा बिल्डरांवर गोळीबाराच्या घटना घडल्याएत.
काल एस.के ब्रदर्सच्या सुनील कुमार लाहोरिया यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ७ फेब्रुवारीला सिडकोचे क्लार्कची साडेबारा टक्के विभागाच्या भूखंड वाटपातून हत्या करण्यात आली. तर १३ नोव्हेंबर २०१२ला पनवेलला चार ईस्टेट एजन्टला आपला प्राण गमवावा लागला. यात रामदास पाटील, नितीन जोशी, प्रितम घरत आणि बलराम टोपलेंचा जीव गेला. तर खंडणीसाठी उलवा नोडमध्ये बिल्डरांच्या कार्यालयात फायरिंग करण्यात आली होती. नवी मुंबईत जमिनीला आलेल्या सोन्याचे भाव यामुळे ही स्पर्धा जीवघेणी ठरतायेत.