www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वेला कोर्पोरेट संचालनसाठी उत्कृष्ट मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे कोकण रेल्वेच्या मानात तुरा खोवला गेला आहे. वर्षभरात प्रवाशी सुविधा आणि महसुलामध्ये वृद्धी केल्याने हे मानांकन देण्यात आले आहे.
या आधी जागतिक बॅंकेकडून कोकण रेल्वेची प्रशंसा करण्यात आली आहे. कोकण रेल्वेला अलिकडेच सार्वजनिक उद्योग विभागातर्फे (Department of Public Enterprises) कॉर्पोरेट संचालनासाठी "उत्कृष्ट" मानांकन देण्यात आले आहे. हे मानांकन वर्ष 2012–13 साठी देण्यात आले असून ते DPE च्या मार्गदर्शिका पालनच्या कसोटीवर देण्यात येते. वर्ष 2013–14 मध्ये कोंकण रेल्वेने प्रवाशी सुविधा आणि महसुलातही विक्रमी वाढ केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे परिचालन सुरु झाल्यापासून या वर्षी प्रथमच कोकण रेवेने मालवाह्तुकीतून 400 कोटी रुपए अर्जित केले जे 2012–13 च्या तुलनेत 17.5 चक्के जास्त आहे. 2013–14 मध्ये एकूण महसुलातही 7.3 टक्यांची वाढ झाली असून कोंकण रेलवे ने 1220 कोटी रुपए अर्जित केले. परिचालन अधिशेषात ही 2012–13 च्या तुलनेत 29.8 चक्के वाढ झाली आहे. NTKM (Net Tonne Kilometer) जे रेल्वेचे कमाईचे मुख्य साधन मानले जाते, त्यातही या वर्षी कोकण रेल्वेने 8.7 टक्याची वृद्धी नोंदविली आहे.
वर्ष 2013–14 मध्ये कोकण रेलवे ने आपल्या मार्गावर 5 नवील गाड्या सुरु केल्या आहेत. तर प्रवाशांच्या मागणीवरुन खेड , बैंदूर , कुंदापुर पोस्ट येथे नवीन PRS सेंटर उघड्ण्यात आले. तसेच कुडाळ स्थानकावर वरिष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र खिडकी सुरु करण्यात आली. उडूपी व पादूबिद्री या स्थानकां दरम्यान इन्नंजे नावाचे एक नवीन हॉल्ट स्टेशन उघडण्यात आले. 3 स्थानकांवर बॉयो टॉयलेट लावण्यात आले आणि 5 बांधण्याचे काम सुरु आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.