www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरमध्ये पारा 42 अंश सेल्सियसच्या वर पोहचालाय. येत्या काही दिवसात नागपूरसह विदर्भातल्या नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे उष्णतेच्या वाढत्या तडाख्यापासून सांभळण्याची खबरदारी नागपूरकरांनी घेणं आवश्यक आहे.
मे महिना जवळ येत असल्यानं नागपूरसह विदर्भाच्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. सध्या विदर्भात परीक्षेचे दिवस असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेबरोबर वाढत्या उन्हाचाही धास्ती सतावतीय. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असलेल्या कुणाल माहुर्लेच्या मनात तर अभ्यासाची भीती तापमानाने घेतलीय.
एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट वाढण्यासाठी अनुकूल स्थिती असल्यानं येत्या काही दिवसात तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.वाढत्या तापमानामुळे घराबाहेर जातांना उन्हापासून बचाव होण्यासाठी स्कार्फ आणि गॉगलचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे आधीच उन्हाचे चटके सहन करणा-या नागपूरकरांना येत्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.