वाढदिवसाचं होर्डिंग हटवलं, आमदाराकडून मारहाण...

कल्याण (पूर्व) इथले राष्ट्रवादी पक्ष समर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाम केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 14, 2013, 12:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याण (पूर्व) इथले राष्ट्रवादी पक्ष समर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाम केलीय. वाढदिवसाचे अनधिकृत होर्डिंग काढल्याबद्दल गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलीय.
गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग कल्याण शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. बैलबाजार परिसरात एक होर्डिंग लावलं गेलं होतं ते अनधिकृत होर्डिंग पालिकेनं हटवलं याचा राग मनात धरून एकनाथ शेट्टे यांनी ही मारहाण करण्यात आलीय. शेट्ये महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बोर्ड कारवाई प्रमुख आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी एकनाथ शेट्टे यांना गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात नेऊन मारहाण केलीय. गायकवाड यांनी शेट्ये यांना सकाळी आठ वाजल्यापासून कोंडून ठेवलं होत, अशी माहिती आता समोर येतीय.

गायकवाड यांनी पालिकेचे गणेश बोराडे यांनाही फोनवरून धमकी दिलीय. ‘माझे होर्डिंग्स कसे काय हटवले... आम्ही बघून घेऊ’ अशी धमकी त्यांना देण्यात आलीय. गायकवाड यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.