मुंबई : गुजरातमधले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल मुंबईकडे रवाना झालेत... ते उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
गुजराती मतं शिवसेनेकडे वळवण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं बोललं जातंय...
यापूर्वी गुजराथी समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर गिरगाव येथील भाषणात उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाजाला आणि व्यापाऱ्यांना उद्देशून म्हटले की, अनेक जणांनी मला सांगितले की, एकही भूल कमलका फूल त्यामुळे गुजराती मतदार हे शिवसेनेला मतदान करणार असल्याचे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल आणि उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईमध्ये पटेल समाज मोठ्या प्रमाणात आहे. भाजपला मतदान न करता शिवसेनेला साथ द्यावी अशी विनंती हार्दिक पटेल या माध्यमातून करू शकतो.
तसेच हार्दिक पटेल हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे.