क्लस्टर डेव्हलपमेंट- राष्ट्रवादीच्या नेत्यांचं उपोषण मागे

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरुन ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागं घेतलंय. मागील दोन दिवसांपासून ते उपोषणावर होते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 6, 2013, 07:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरुन ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागं घेतलंय. मागील दोन दिवसांपासून ते उपोषणावर होते.
आज नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर या नेत्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. महिन्याभरात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्यावतीनं उदय सामंत यांनी दिलंय.
मंगळवारी किंवा बुधवारी गणेश नाईक, सामंत आणि मुख्यमंत्री अशी महत्त्वाची बैठक होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.