www.24taas.com, ठाणे
दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात दुष्काळाबद्दल मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे सिडकोवगळता म्हाडा आणि एमएमआरडीएचा कारभार काँग्रेसच्या अखत्यारित येतो. त्यामुळे आव्हाडांनी दुष्काळावरून काँग्रेसला चिमटीत पकडण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जातेय.
सिडकोला साडेसात हजार कोटी, एमएमआरडीएला साडेनऊ हजार कोटी, तर म्हाडाला अडीच हजार कोटी रुपये निधी आहे. यापैकी पन्नास टक्के निधी दुष्काळग्रस्तांसाठी द्यावा अशी आव्हाड यांची मागणी आहे.