www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरुन डबल डेकर रेल्वेची शनिवारी चाचणी घेण्यात आली. मुंबईवरुन सोडलेली ही रेल्वे गाडी कोकण रेल्वे मार्गावरून कशाप्रकारे धावू शकते याची चाचणी घेण्यात आलीय.
दहा डब्यांची ही गाडी यशस्वीरित्या चालवत रत्नागिरी स्थानकापर्यंत आणण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावरुन पहिल्यांदाच अशा प्रकारची ही डब्बल डेकर ट्रेन चालवण्यात आली. रिकामी असलेली डबल डेकर ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली तेव्हा डबल डेकर ट्रेन पाहण्यासाठी अनेक रत्नागिरीकर रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाले होते.
ही ट्रेन सीएसटी ते मडगावपर्यंत धावणारी एसी एक्स्प्रेस असेल. शनिवारी रोह्यापर्यंत चाचणी पार पडली. या एक्स्प्रेसच्या आणखी काही चाचण्या होणार असून, त्यांच्या सुरक्षाविषयक अंतिम अहवाल आठवड्याभरात आल्यानंतर ही सेवा प्रत्यक्ष सेवेत आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
`कोरे`च्या सीएसटी ते मडगावपर्यंत जाणाऱ्या डबलडेकर एसी एक्स्प्रेसचे दहा डबे गेल्या आठवड्यात मुंबईत दाखल झाले. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) इथं या डब्यांची देखरेख केली जात आहे. या एक्स्प्रेसची प्रत्यक्ष चाचणी मडगावपर्यंत संपूर्ण मार्गावर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. मध्य रेलवेच्या अखत्यारित रोहा आणि त्यापुढे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण चाचण्या पार पडणार आहेत. त्यापैकी पहिल्या चाचणीचा मुहूर्त शनिवारी साधण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.