www.24taas.com, झी मीडिया, ऱत्नागिरी
कोकणचा सौंदर्य प्रत्येकाला खुणावतोच. निळा क्षार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळेच यावर्षी नववर्षाचं स्वागत कोकणात करावं याच बेताने. सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालय. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल्ल झालीयेत.
दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश,मुंबई आणि पुण्यातून कोकणात पर्यटक दाखल झालेत. ही संख्या तीन ३ लाखांवर गेलीये. परदेशी पाहुण्यांनीही समुद्र किना-यांनाच जास्त पसंती दिलीय. नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात तसेच गोव्यात जाण्याचे प्लॅन आखले जातात. मात्र यावर्षी पर्य़टकांना कोकणाला जास्त पसंती दिलीय.
परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतायत त्याच सुविधा आता कोकणात देखील मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागलयेत. गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली अशा ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.