मीरा-भाईंदर पालिका निकाल, जोरदार चुरस

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चुरस आहे. भाजपनं ९ जागांच्या विजयासह आघाडी घेतली आहे.

Updated: Aug 13, 2012, 01:38 PM IST

www.24taas.com
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चुरस आहे. भाजपनं ९ जागांच्या विजयासह आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या ६ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेनेनंही खाते उघडले असून काँग्रेस आणि मनसेच्या हाती अजून विजय लागलेला नाही. तर काँग्रेसचे विद्यमान महापौर तुलसीदास म्हात्रे यांचे चिरंजीव विकास म्हात्रे पराभूत झाले आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेचे पहिले दोन निकाल राष्ट्रवादीच्या बाजूनं लागले आहेत. प्रभाग क्र. ३० मधून राष्ट्रवादीचे नरेश पाटील आणि शबनम शेख विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीनं आतापर्यंत चार जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपनेही चार जागांवर विजय मिळवला आहे. प्रभाग क्र. ३१ मधून सुजाता शिंदे आणि यशवंत कांगणे विजयी झाले. तर प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या सुमन कोठारी विजयी झाल्या आहेत.
प्रभाग ३१ मधून भाजपचे नरेंद्र मेहता तर प्रभाग १ मधून राष्ट्रवादीचे सॅन्ड्रा रॉड्रीग्ज विजयी झालेत. भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चुरस असल्याचं चित्र सध्यातरी दिसतं आहे. प्रभाग ५ मधून भाजपाचे रोहीदास पाटीलही विजयी झालेत.