मनसेचा पोटनिवडणुकीतही पराभव, सेनेने मारली बाजी

कल्याण - डोंबिवलीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने विजय मिळविला आहे. तर मनसेला इथे पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

Updated: Oct 15, 2012, 06:52 PM IST

www.24taas.com, कल्याण
कल्याण - डोंबिवलीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने विजय मिळविला आहे. तर मनसेला इथे पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
महापालिका पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची तर भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची सरशी झालीय.
कल्याण डोंबिवली वॉर्ड क्रमांक ३० मधून शिवसेनेचे प्रभूनाथ भोईर विजयी झालेत. तर भाईंदर वॉर्ड क्रमांक २७ मधून राष्ट्रवादीचे बार्बरा रॉड्रीक्स यांचा विजय झालाय. त्यांनी भाजप उमेदवाराचा ७५० मतांनी पराभव केला.