बँकेच्या गाडीवर भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा!

नालासोपा-यात ऍक्सिस बँकेजवळ भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा टाकण्यात आला. कॅश व्हॅनमध्ये रोख रक्कमेचं हस्तांतरण सुरू असताना पाच ते सहा दरोडेखोर एका क्वालिसमधून आले आणि कॅश असलेल्या पेट्या घेऊन फरार झाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 28, 2013, 08:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नालासोपारा
नालासोपा-यात ऍक्सिस बँकेजवळ भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा टाकण्यात आला. कॅश व्हॅनमध्ये रोख रक्कमेचं हस्तांतरण सुरू असताना पाच ते सहा दरोडेखोर एका क्वालिसमधून आले आणि कॅश असलेल्या पेट्या घेऊन फरार झाले.
दुपारी चार-साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. ही क्वालिस विरारच्या मनवेल पाडा परिसरात सापडली. मात्र त्यातली रक्कम घेऊन दरोडेखोर फरार झालेत. दरोडेखोर बाईकवरून फरार झाल्याचं सांगण्यात येतंय.
बँकेत एवढी मोठी रोख रक्कम असताना तिथं पुरेशी सुरक्षा का नव्हती, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.