www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
मध्य रेल्वेच्या दिवा पॅसेंजर गाडीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन अाल्याने रोहा-दिवा गाडी रोहा येथे थांबविण्यात आली. मात्र, ही अफवा असल्याची माहिती पुढे आली.
बॉम्बच्या फोनने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. ही पॅसेंजर रोहा येथे थांबवून ठेवण्यात अाल्याने भीतीचे वातावरण होते. दरम्यान, अलिबागहून बॉम्बशोधक पथक रोहा येथे दाखल झाल्यानंतर शोध घेतल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाच तासानंतर गाडी सोडण्यात आली.
रोहा येथून पहाटे 5.15 ची रोहा - दिवा ही लोकल सुटली. त्याचवेळी एक निनावी फोन आला. गाडीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा तो फोन होता. पहाटे आलेल्या फोनमुळे सर्वांची तारांबळ उडाली. रेल्वे प्रशासनाने दक्षता घेत रोहा येथे तात्काळ गाडी रोखून धरली. गाडीचे तपासणी करण्यासाठी बॉम्बशोधक पथक अलिबागहून मागविण्यात आले. पथक पोहोचताच गाडीची पाहाणी करण्यात आली. मात्र, रेल्वेमध्ये काहीही संशायस्पद सापडले नाही. त्यामुळे ही अफवा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.