एनसीपीचे खासदार उदयनराजेंच्या पोस्टरवर मोदी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे नक्की राष्ट्रवादी पक्षाचे आहेत की नाही? हा प्रश्न अनेकांना नेहमीच पडत असतो. आता निवडणूक जिंकल्यानंतर देखील हाच प्रश्न अनेकांना पडला आहे

Updated: May 19, 2014, 03:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे नक्की राष्ट्रवादी पक्षाचे आहेत की नाही? हा प्रश्न अनेकांना नेहमीच पडत असतो. आता निवडणूक जिंकल्यानंतर देखील हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
आता तर राजेंनी आपल्या मतदार संघात `अब की बार मोदी सरकार`चं होर्डिंग लावलंय. या होर्डिंगमध्ये राजेंचा फोटो चक्क मोदींसोबत लावला आहे. तसंच होर्डिंगमध्ये राजेंकडून मोदींना विजयाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.
हे होर्डिंग उदयनराजेंच्या एका चाहत्यानं लावलं होतं. पण या होर्डिंगची चर्चा चांगलीच रंगल्यानं नंतर हे होर्डिंग उतरवण्यात आलं. या प्रकरणाबाबत राजेंकडून काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. फक्त हे होर्डिंग राजेंनी लावला नाही, इतकंच सांगण्यात आलंय. उदयनराजेंच्या या होर्डिंगमूळं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच झटका बसलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.