सात मजली इमारत कोसळून नऊ ठार

ठाण्यात शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळलीय. या अपघातात ९ जण ठार ते ४५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2013, 10:51 PM IST

www.24taas.com, ठाणे
ठाण्यात शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळलीय. या अपघातात ९ जण ठार ते ४५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आहे.
लकी कम्पाऊण्डमधली बिल्डिंग कोसळलीय. ढिगा-याखाली काही जण अडकल्याची भीती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू झाले असून आतापर्यंत सात जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढले आहे. या ढिगाऱ्याखाली अजून ३० ते ४० जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. सात मजली इमारत संपूर्ण कोसळली आहे. दोन महिन्यांपूर्वी ही इमारत बांधून पूर्ण झाली होती. नवीन बिल्डिंग असताना कशी पडली हे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
इमारत बांधलेला बिल्डर आणि महापालिकेच्या कारभारावर आता टीकेची झोड उठवली जात आहे.