डहाणूजवळ डेहरादून एक्स्प्रेसला आग, नऊ ठार

ठाणे जिल्ह्यातील डहाणूजवळ डेहरादून एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत ७ ठार झाले आहेत. डहाणू-घालवडजवळ ही आग लागली आहे.

Updated: Jan 8, 2014, 01:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे जिल्ह्यातील डहाणूजवळ डेहरादून एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत नऊ ठार झाले आहेत. डहाणू-घालवडजवळ ही आग लागली आहे.
आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाही. एस - २ आणि एस - ४ या बोगीला ही आग लागली आहे.
ज्या ठिकाणी या बोगींना आग लागली आहे. अपघात स्थळ रस्त्यापासून लांब असल्याने मदतीला अडचण येत होती. पण स्थानिकांनी जखमी प्रवाशांना रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यास मदत केली आहे.
डेहाराडून एक्सप्रेसच्या 3 डब्यांना डहाणू आणि घोलवड दरम्यान आग लागलीय.S-2 ते S-4 या डब्यांना ही आग लागली असून यामध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय.
आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग आटोक्यात आली असल्याची माहिती आहे.
अपघातग्रस्तांचे नातेवाईक मदतीसाठी या हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधू शकतात.
BCT (मुंबई सेंट्रल) - 23011853, 23007388
BDTS(वांद्रे टर्मिनस) - 26435756
DRD (डहाणू रो़ड) - ऑटो - 67649632
BL (वलसाड) - 241903
ST (सूरत) - 02612423992
डेहराडून एक्स्प्रेसला लागलेल्या आगीमुळे प्रवासामधल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
देशातील काही मोठे रेल्वे अपघात
19 जुलै 2010 - उत्तरबंगा एक्स.- वनांचल एक्स.मध्ये धडक 60
ठार
22 मे 2011 - बिहारमध्ये मधुबनी जिल्ह्यात रेल्वे क्रॉसिंगवर
पॅसेंजर वाहनाला धडकली, 16 ठार
30 जुलै 2012 - तामीळनाडू एक्स. नेल्लोजवळ आग, 35
ठार
19 ऑगस्ट 2013 - बिहारमध्ये ट्रॅक ओलांडताना अपघात,
37 ठार

व्हिडिओ पाहण्यासाठी -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.