www.24taas.com, ठाणे
ठाणे परिवहन सेवेच्या भाड्यामध्ये एक रुपयानं वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमेध्ये मंजुरी देण्यात आली आली आहे. यामुळे पहिल्या टप्प्यासाठी चार रुपयांएवजी ठाणेकरांना आता पाच रुपये मोजावे लागणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ प्रत्यक्ष लागू होणार असून यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. डिझेलचे वाढलेले दर, महाग झालेले स्पेअरपार्टस् यामूळे परिवहन सेवेच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं महासभेपुढे ठेवला होता. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. या भाडेवाढीमुळे परिवहनच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
नव्या पद्धतीचे तिकीटदर बेस्टच्या धर्तीवर तयार करण्यात आले असून २ किलोमीटरसाठी १ रुपया... २ ते ३ किलोमीटरसाठी ७ रुपये तर ३ ते ४ किलोमीटरसाठी १० रुपयांपर्यंत जास्त भाडं ठाणेकरांना मोजावे लागणार आहे.