www.24taas.com,लंडन
सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी खूपचं चिडचिडा झालाय. स्वतःहून कितीही खूश राहण्याचा प्रयत्न केला तरी मनासारखं खूश राहता येत नाही. पण या समस्येवर संशोधकांनी चांगलाच तोडगा काढलाय. संशोधकांच्या मते, जी माणसं समप्रमाणात फळं आणि भाज्यांचे सेवन करतात, त्यांच्या स्वभावात प्रसन्नता निर्माण होते. वैज्ञानिकांनी या अभ्यासाचे परिक्षण करत असताना, ८० हजार ब्रिटीशांना विचारले कि त्यांच्या रोजच्या जेवणात कुठल्या पदार्थांचा समावेश असतो, आणि त्यांची नेहमीची मनस्थिती कशी असते.
संशोधकांनी असा अभ्यास केलाय कि जी माणसं आपल्या जेवणात फळ आणि भाज्यांचा योग्य प्रमाणात समावेश करायची ती माणसं फळ-भाज्या न खाणाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रसन्न आणि खूश असतात. तथापि फळ- भाज्या खाल्ल्याने स्वभावात एवढा चांगला फरक का होतो याचा उलगडा असून झालेला नाहr. फळं-भाज्यांमध्ये एंटीऑक्सिडेन्ट नावाचे पोषक तत्व असतात, आणि या एंटीऑक्सिडेन्टमुळे शरिरावरील ताण कमी होण्यास मदत होते.
केलेल्या अध्ययनाचा असाही निकाल लावण्यात आलाय की तरूण वयात जर योग्य फळं-भाज्यांचा सेवन केलं तर उतारवयात निर्माण होणारे ताणतणाव कमी होतात. यासंदर्भात अध्ययन करणारे विश्वविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे एन्ड्र्यू ऑसवाल्ड यांनी सांगितलं, की अभ्यास करताना अनेक आश्चर्यजनक परिणाम समोर आलेत. फळं-भाज्यांमध्ये असणारे एंटीऑक्सिडेन्ट हे शरीरावर होणाऱ्या रोगांच्या हल्ल्यांपासून वाचवण्याचे कार्य करते. पण एंटीऑक्सिडेन्टचे पोषक द्रव्य मनुष्यप्राण्याला प्रसन्न राहण्यास कसे मदत करते याबद्दलचे गूढ अजून तरी उलगडलेले नाही.