नखाचं सौंदर्य वाढवण्यासाठी काही खास...

आपण आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या नखांकडे दुर्लक्ष करतो. पण काळजी करू नका आम्ही कारण तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही खास टिप्स...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 10, 2013, 10:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आत्ताच्या काळात सौंदर्याच्या नावावर एक मोठी बाजारपेठ निर्माण झालीय. अनेक सौंदर्य प्रसाधनं या बाजाराचा हिस्सा आहेत. सौंदर्य वाढविण्याचे प्रत्येक साधन हे कुठे ना कुठे रचनात्मकता व कल्पकतेशी जोडलं गेलंय. मग वेगवेगळ्या पध्दतीच्या केशरचना असो किंवा कपाळावर लावण्यात येणाऱ्या विविध आकारातील टिकल्या किंवा `नेल आर्ट` मधील चमचमणारे स्टार्स... शरीराच्या प्रत्येक भागाला सौंदर्याचा स्पर्श व्हावा यासाठी स्त्रिया अत्यंत जागरूक असतात. मग नखासारखा अतिशय लहान भाग का असेना. नखे सुंदर दिसण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजविले जातात.
सौंदर्यातही तंत्रज्ञान आलंय... पण हे न करताही आपण स्वत:च्या कल्पनाशक्तीनं नखे सजवू शकतो. नखांना‍ छिद्र पाडून त्यात आपण रिंगही घालू शकतो तसंच आवडत असल्यास प्रत्येक नख वेगवेगळ्या पध्दतीने रंगवू शकतो. आज बाजारात आर्टिफिशिअल नखंसुध्दा मिळतात. यामुळे आपण नखे वाढविण्याच्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. आपण आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या नखांकडे दुर्लक्ष करतो. पण काळजी करू नका आम्ही कारण तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही खास टिप्स...

 हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा मेनिक्युअरिंग करा. घरच्या घरी मेनिक्युअर केलं तरी कमीत कमी चार ते सहा आठवड्यांतून एकदा पार्लरमधून मेनिक्युअर करून घ्या.
 आंघोळीनंतर मेनिक्युअर करणं उत्तम. याचं कारण म्हणजे खूप पाण्यामुळे नखांतील मळ निघालेला असतो.
 आठवड्यातून एकदाच नेलपेन्ट रिमूव्हरचा वापर करा. रिमूव्हरचा अतिवापर केल्यास नखं कोरडी पडतात.
 नखांना मॉइश्चरायझर पुरवण्यासाठी एखाद्या क्लीअर / ट्रान्स्परन्ट नेलपेन्टचा वापर टॉप कोट किंवा सीलर म्हणून करता येईल.
 साबणाने हात धुतल्यावर क्रीम किंवा लोशन लावा. साबणामुळे हात आणि नखं कोरडी पडतात. नखांना आणि हातांना पुरेसं मॉइश्चरायझर मिळावं यासाठी लोशन, क्रीम लावा.
 झोपण्यापूर्वी हात आणि पायांना तेल किंवा मॉइश्चरायझर लावा.
 नेलपेन्ट लावताना हवेशीर जागेत बसणं अधिक योग्य. खिडकीजवळ किंवा हवा असेल अशा जागेत बसूनच नेलपेन्ट लावा.
 नेलपेन्ट लावण्यापूर्वी नेलपेन्टची बाटली हलवून घ्या.
 क्लिअर नेलपेन्टचा बेस कोट लावल्यावर कलर नेलपेन्ट नखांना लावा.
 मध्यभाग, डावा आणि उजवा किंवा उजवा, मध्यभाग आणि डावा अशा क्रमाने नेलपेन्ट लावा.
 नेलपेन्ट लावताना नेहमी दोन कोट लावा. दोन पेक्षा अधिक कोट लावल्यास नखांच्या वाढीचा वेग कमी होतो.
 नेलपेन्टचा पहिला कोट सुकल्यावरच दुसरा कोट लावा.
 अॅसिटोनचा वापर रीमूव्हर म्हणून करू नका.
 नेलपेन्टची बाटली थंड आणि कोरड्या जागेत, सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. ही बाटली तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.
 क्युटिकल्स काढण्यासाठी किंवा नखांवरील नेलपेटं काढताना मेटल इक्विपमेण्टस वापरू नका.
 सर्वांत मह्त्वा चे म्हणजे नखं कुरतडू नका. नखं चावल्यामुळे नखं आणि क्युटिकल्स तुटून नखांचा शेप तर बिघडतोच शिवाय नखांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. तसंच यामुळे इन्फेक्शनही होऊ शकते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.