न्यूयॉर्क : महिला कोणत्याही अन्य महिलेला परफ्यूम भेटवस्तू म्हणून देत नाहीत, तर त्यांच्याकडून परफ्यूम घेतही नाहीत, असे मनोरंजक विश्लेषण एका अभ्यासातून समोर आले आहे.
जर कोणती महिला आपल्या प्रियजनांकडून परफ्यूम भेटवस्तू म्हणून घेत असेल, किंवा कोणाला देत असेल, तर नक्कीच तिला त्या परफ्यूमचा सुगंध आवडत नसणार, असे फुड 'कॉलिटी एंड प्रिफरेंस' या मासिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात दिले आहे.
खूप महिला आपल्या आवडीच्या परफ्यूमला गुपित ठेऊ इच्छितात. कारण तो त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
महिला एकाचं सुगंधाचा परफ्यूम कितीतरी वर्षे वापरतात, यामुळे त्यांच्या आयुष्यातील एक भागचं होऊन जातो.
काही महिला तर आपल्या मित्र मंडळींमध्ये सुद्धा याबाबत गुप्तता पाळतात, असे वक्तव्य अमेरिकेच्या ब्रीघम यंग युनिवर्सिटी मधील प्रोफेसर ब्रायन हॉवेल यांनी केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.