धक्कादायक: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

मुंबईत गर्भपाताचं प्रमाण धक्कादायकरित्या वाढल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिलीय. ऑनलाईन औषधं घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याचं उघड झालंय. 

Updated: Jul 17, 2015, 03:52 PM IST
धक्कादायक: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं title=

मुंबई: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण धक्कादायकरित्या वाढल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिलीय. ऑनलाईन औषधं घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याचं उघड झालंय. 

संकेतस्थळावरून जाहीरात करून उत्तेजक गोळ्या आणि  गर्भनिरोधक औषधांची ऑनलाईन विक्री करत असल्याची माहिती सरकारनं दिलीय. अन्न औषध विभागाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी खडसेंनी दिल्या आहेत. 

यासंदर्भातला कायदा केंद्राचा आहे त्यामुळं कारवाईसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलंय. तसंच याबाबत कठोर कायदा करून कडक कारवाई करावी अशी विनंती केंद्राकडे करणार असल्याचीही माहिती राज्य सरकारनं दिलीय. 

मुंबईत गर्भपाताचे प्रमाण जास्त

- १५ वर्षाखालील १८५ मुलींनी गर्भपात केल्याची नोदं

- १९ वर्षांखाली १६०० मुलींनी गर्भपात केला आहे

- मुंबईत वर्षभरात ३० हजार महिलांनी केला गर्भपात 

- ऑनलाईन औषधं घेऊन गर्भपात मोठ्याप्रमाणवर होत असल्याची सरकारची विधानसभेत माहिती

- संकेतस्थळावरून जाहीरात करून उत्तेजक गोळ्या आणि गर्भनिरोधक औषधांची ऑनलाईन विक्री

- केंद्राचा कायता असल्यानं कारावाईसाठी राज्य सराकर केंद्राकडे पाठपुरवा करत आहे

- इंटनेटवरून विक्री केल्या जाणाऱ्या कंपन्यांची कार्यालये देशाबाहेर

- त्यांच्यावर कशी कारवाई करायची याचे मार्गदर्शन केंद्राकडे मागवले

- स्नॅपडिल आणि शॉप क्लूज डॉट कॉम या दोन वेबसाईटवर कारवाई

- केंद्राने कायदा कठोर करून कारवाई करावी अशी विनंती केंद्राला करणार

- कायद्यातील त्रूटी दूर करम्यासाठी राज्याला जे अधिकार आहेत त्या दूर करून कारवाई करू

- राज्याबाहेरून होत असेल त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे, केंद्राने अनुकूल उत्तर दिले आहे

- गर्भनिरोधक किट्स औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध असतात

- अन्न औषध विभागाच्या माध्मातून कठोर कारवाई करावी अशा सूचना

- प्रिस्क्रिप्शन शिवाय किट विकली जात असेल तर फार्मासिस्टचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.