२०१२ हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत रोमांचकारी ठरणार आहे. ज्यांनी अत्यंत मोठे स्वप्न पाहिलेत त्याची स्वप्नपूर्ती होईल. तुमच्यासाठी नव्या आशेचा किरण निर्माण होईल, या वर्षाचे पहिले ३ महिने हे आपल्या करिअर आणि आर्थिक बाबतीत भरभराट करणारे ठरतील. पुढील तीन महिन्यात तुमच्या कामामध्ये तुम्हांला चागंल यश मिळेल. २०१२ मधील येणाऱ्या समस्या आणि त्यातील चढ-उतार यांना तुम्ही अत्यंत सक्षमपणे तोंड द्याल. काही नव्या गोष्टी तुम्हांला अधिक यश मिळवून देईल.
आपण अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागाल. तुमच्या वरिष्ठांशी अत्यंत ताळमेळ ठेवून आणि समझदारीने वागून काम कराल आणि त्या गोष्टीचा आनंद घ्याल. तुम्हाला तुमचे मित्र आणि हितचिंतकांचा चांगला पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये काही अप्रत्यक्षिकरित्या आर्थिक सम्स्या येऊ शकते, पण तुमच्या सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनत करण्याची जिदृ यामुळे ती समस्या सहज दूर करू शकाल.
तुम्ही कामामध्ये नेहमीच दक्ष असाल पण काही नियम तोडण्यासाठी तुम्हांला काही प्रलोभन दिली जातील, पण त्यावेळेस कायद्याला धरून आपण आपला कार्यभार साधावा. जोपर्यंत आपला व्यवहार योग्य असेल तोपर्यंत तुमच्या विकासात एक गती कायम राहील. पण करिअरमध्ये बदल होण्याच शक्यता आहे.
आपल्या जीवनसाथी सोबत तुमच प्रेम दृढ होत जाईल. आपण वैवाहिक जीवनात नेहमीच यशस्वी राहाल. आपली सोबतीला २०१२ वर्षाच्या सुरवातीला स्वास्थाविषयी समस्या निर्माण होऊ शकेल. त्यासाठी तुमच्या पत्नीची काळजी घ्या. तुमच्यात असणाऱ्या गुणांमुळे तुम्ही सर्वपरिचित असाल, कुटुंबातील आणि समाजातील सदृस्याकडून तुम्हांला त्या गोष्टीची पोचपावती मिळेल. तुमच्या व्यवहार नेहमीच स्वच्छ असेल आणि त्याचा फायदा तुम्हांला निश्चित होईल.
तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुमचं आरोग्य चागंल राहिल. तुम्हांला एक सल्ला आहे की, फिट आणि फाईन राहण्यासाठी नियमीतपणे हेल्थ क्लबमध्ये जात जा. यावर्षी तुमची स्वप्न पूर्ण होतील. परदेशी प्रवासाच योग संभवतो आहे. प्रिय व्यक्तीसोबत प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.