मीन- अनपेक्षित लाभ होतील

२०१२ हे दीर्घकालीन भागीदारीसाठी चांगलं वर्षं आहे. व्यवसायिक जीवनात पुरस्कार आणि मान-सन्मान यांनी हे वर्ष झळाळू उठेल. नातेसंबंधांत मोठं परिवर्तन घडेल. ज्येष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

Updated: Jan 4, 2012, 06:40 PM IST


२०१२ हे दीर्घकालीन भागीदारीसाठी चांगलं वर्षं आहे. व्यवसायिक जीवनात पुरस्कार आणि मान-सन्मान यांनी हे वर्ष झळाळू उठेल. नातेसंबंधांत मोठं परिवर्तन घडेल. ज्येष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

 

 

वर्षाचे पहिले सहा महिने खूप विविध घडामोडींनी भरलेले असतील. तुम्हाला प्रचंड मेहनत करून या काळात अधिकाधिक लाभ करून घ्यायला हवा. तुमचे वरिष्ठ, बॉस इ. लोकांशी कोणत्याही प्रकारची हुज्जत घालू नका. वाद- विवाद टाळा. २०१२ हे करीअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारं ठरेल. नव्या जबाबदाऱ्या आणि नवी आव्हानं तुम्हाला समाधानकारक ठरतील. तेच तेच काम करून त्यात आलेला एकसाचीपणा यावर्षी तुम्ही मोडून काढाल.

 

 

सप्टेंबर ते डिसेंबर या काळात कामाला खूप गती मिळेल. तुमच्यावर कामाचा ताण प्रचंड वाढेल. पण, नवं काम आणि नवं लक्ष्य तुम्हाला आनंद देईल. यातील यश तुम्हाला मान-सन्मान मिळवून देईल. तुमच्यातील काही जणांना कदाचित या काळात सहकाऱ्यांशी पटवून घेणं जड जाईल. त्यांच्या पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित व्हायला वेळ लागेल.

 

या वर्षी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काही गोष्टींचा त्याग केलात तर तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर जास्त प्रेम करू लागेल. यावर्षी तुमचीच अतिशय जवळची एखादी व्यक्ती तुमची जीवनाची जोडीदार बनू शकेल.

 

व्यापारी वर्गाला जाणवेल की आपला आधीचा बिझनेस हा तिकतकासा फायदेशीर ठरत नसून नवीन संधी शोधायला तुम्ही सुरूवात कराल.

 

वर्षाचे पहिले सहा महिने हे अनपेक्षित अडथळे निर्माण करणारे ठरतील. पण सप्टेंबर ते डिसेंबर या काळात तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहेत. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रमोशन्स मिळतील. मात्र, शेयर्समध्ये पैसे गुंतवायचे टाळा. करियरसाठी हे वर्ष उत्कृष्ट आहे. मात्र, करियरच्या नादात कुटुंब आणि मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. प्रकृतीची काळजी घ्या.

Tags: