१० लाख गूगल अकाऊंट धोक्यात

जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या १० लाखाहून अधिक अकाऊंट्सवर सुरक्षेच्या बाबतीत धोका निर्माण झाला आहे. अँड्रॉइड मालवेयरचा नवा वर्जन गूलीगन याला जबाबदार आहे. ऑनलाइन सि‍क्‍युरि‍टी कंपनी चेक प्वाइंट सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार गूलीगनने गूगलचे १० लाखाहून अधिक अकाउंट्सची माहिती चोरली आहे. गुगलने याबाबत कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Dec 1, 2016, 01:23 PM IST
१० लाख गूगल अकाऊंट धोक्यात title=

मुंबई : जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या १० लाखाहून अधिक अकाऊंट्सवर सुरक्षेच्या बाबतीत धोका निर्माण झाला आहे. अँड्रॉइड मालवेयरचा नवा वर्जन गूलीगन याला जबाबदार आहे. ऑनलाइन सि‍क्‍युरि‍टी कंपनी चेक प्वाइंट सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार गूलीगनने गूगलचे १० लाखाहून अधिक अकाउंट्सची माहिती चोरली आहे. गुगलने याबाबत कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

चेक पॉइंटचे हेड ऑफ मोबाईल प्रोडक्‍ट्स माइकल शोलोव यांच्या मते गूलीगनने 10 लाख गूगल अकाऊंटची माहिती चोरी केली आहे. हे खूप धोकादायक असू शकतं. यामुळे जीमेल, गूगल फोटो, गूगल प्ले आणि गूगल डॉक्समधून यूजर्सची माहिती चोरी केली जाऊ शकते. मायकल म्हणतात की, मागच्या वर्षी हॅकर्सने त्यांची योजना पूर्णपणे बदलली. आता हॅकर्स पर्सनल कम्प्यूटर्स ऐवजी मोबाईल डिवाइसला टार्गेट करत आहेत.

काय करत आहे Gooligan मालवेअर

मालवेअर रोज १३,००० डि‍वाइसेसवर प्रभाव टाकत आहे. आतापर्यंत गूलीगन अँड्रॉइडने 4 (जेली बीन, कि‍टकॅट) आणि 5 (लॉलीपॉप) ला टार्गेट केलं आहे. मार्केटमध्ये इतर अँड्रॉइड डि‍वाइसेसमध्ये देखील यांची भागीदारी जवळपास ७४ टक्के आहे. यामध्ये ४० टक्के डि‍वाइस आशियामध्ये तर १२ टक्के युरोपमध्ये आहे.

हॅकर्स डि‍वाइसेसवर कंट्रोल केल्यानंतर त्याचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करतात. त्यातून ते पैसे कमवतात. गूगल प्‍लेमधून अॅप इंस्‍टॉल करुन आणि डि‍वाइसच्या मालकाकडून त्याला रेटींग देतात. गूलीगन रोज जवळपास ३० हजार अॅप इंस्टॉल करतात.

गूगलचे डायरेक्‍टर (अँड्रॉइड सेक्‍युरि‍टी) एड्रि‍यन लूडविंग यांनी म्हटलं की, आम्ही चेक पॉइंटसोबत पार्टनरशि‍पचं कौतूक करतो. सोबत आम्ही याबाबत कारवाई करु. मालवेयर की घोस्‍ट पुश फॅमि‍लीपासून यूजर्सला सुरक्षा देण्यासाठी कंपनीने अनेक पाऊलं उचलली आहेत. संपूर्ण अँड्रॉइड ईको-सि‍स्‍टमच्या से‍क्‍युरि‍टीला लवकरच सुधारलं जाईल.