मुंबई : नोकरी मिळवायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती मुलाखत चांगली देणे. तुम्ही जर मुलाखत योग्य प्रकारे दिली तर तुमची नोकरी ही पक्की होते.
नोकरीसाठी इंटरव्हीव्ह मध्ये काय प्रश्न विचारतील याची कल्पना आपल्या नसते. त्यामुळे अनेक लोक इंटरव्हीव्ह दरम्यान घाबरलेले असतात. त्यामुळे आत्मविश्वास देखील कमी होतो.
आम्ही तुम्हाला असे काही प्रश्न सांगणार आहोत जे अनेकदा विचारले जातातच. त्यामुळे याची तयारी करुन गेल्यास तुम्हाला याचा फायदा होतो.
जाणून घ्या मुलाखतीत विचारले जाणारे १० प्रश्न :
१. तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे? का ?
२. तुम्हाला अधिक प्रेरणा कोणाकडून मिळते ?
3. कंपनी उभारण्यासाठी कसे नियोजन कराल?
४. तुम्ही ही नोकरी का करू इच्छिता ?
५. नोकरी करतांना ऑफिसमध्ये मित्र करू इच्छिता का ?
६. तुमच्यातील प्लस गुण कोणते?
७. तुमचे यश कशात आहे असे तुम्हाला वाटते ? चांगली पगार, चांगले काम का इतर काही?
८. ही नोकरी आम्ही तुम्हाला कशासाठी द्यावी ?
९. तुमच्या या कंपनीकडून काय अपेक्षा आहेत?
१०. तुमचं आत्तापर्यंत अॅचिव्हमेंट काय ?