मुंबई : आज जागोजागी तरुण सेल्फी काढतांना दिसतात. सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर करणे ही आजकालची फॅशनच झाली आहे. पण ही सवय तुमच्या जीवनावर परिणाम करते.असं एका संशोधनातून समोर आलंय.
फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल साईट्सवर अनेक फोटो शेअर होत असतात. पण यामुळे तुमच्या प्रेमसंबंधावर परिणाम होऊ शकतो. असं एका संशोधनात समोर आलंय.
१८ ते ६२ वयातील ४२० इंस्टाग्राम युजर्सच्या ऑनलाईन सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की सेल्फी शेअर करणाऱ्या व्यक्ती स्वतःला अधिक सुंदर समजतात आणि त्यामुळे त्यांच्या अंहकार निर्माण होतो. ज्याचा परिणाम जोडीदारावर अधिक होतो.
जोडीदाराला असं वाटते की तुम्ही त्याला कमी महत्त्व देता. तुम्ही स्वत:च्या सेल्फी काढण्यात आणि पोस्ट करण्यात वेळ देता पण तुम्ही त्याला वेळ देऊ शकत नाही.