4जीबी रॅम, जबरदस्त कॅमेरा, मोटो M स्मार्टफोनचं आज लाँचिंग

मोटोरोलाचा मोटो M आज लाँच होण्याची शक्यता आहे. कारण मोटो M वेबसाइट Antutu वर देखील लिस्ट करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनबाबत अनेक लीक रिपोर्टस समोर आले आहेत. 

Updated: Nov 8, 2016, 04:11 PM IST
4जीबी रॅम, जबरदस्त कॅमेरा, मोटो M स्मार्टफोनचं आज लाँचिंग title=

मुंबई : मोटोरोलाचा मोटो M आज लाँच होण्याची शक्यता आहे. कारण मोटो M वेबसाइट Antutu वर देखील लिस्ट करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनबाबत अनेक लीक रिपोर्टस समोर आले आहेत. 

मोटो M सोबत लेनोव्हो वाइब पी2 देखील लाँच होण्याची शक्यता आहे. 

लीक रिपोर्टसनुसार याची किंमत जवळजवळ 20,000 रुपये असू शकते. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचं रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 3000 mAh बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉईड मार्शमेलो 6.0वर आधारित आहे. 

Antutu लिस्टिंगनुसार, मोटो M मध्ये 5.5 इंच फूल एचडी स्क्रीन आहे. ज्याचं रेझ्युलेशन 1080X1920 पिक्सल असू शकतं. मोटो M मध्ये 4 जीबी रॅमसोबत 2.2GHz ऑक्टाकोअर हेलिया P10 प्रोसेसर असू शकतं.