मुंबई : जगभरातील जवळपास सगळ्याच तरुणांना हा प्रश्न सतावत असतो की, कोणतीही मुलगी मेसेजला लगेच रिप्लाय का देत नाही. तर याची ५ कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
५ कारणांमुळे मुली मेसेजला रिप्लाय देत नाहीत
१. अनोखळी नंबर :
तुमचा मोबाइल नंबर जर मुलीसाठी अनोळखी असेल, तर त्या अजिबात रिप्लाय देणार नाहीत. अनोळखी मेसेजला रिप्लाय देणं मुली टाळतात. त्यामुळे मेसेज करण्याआधी त्यांच्याशी बोला.
2. रिलेशनशिप :
जर एखादी मुलगी आधीच रिलेशनशिपमध्ये असेल, तर मुली इतरांना मेसेज किंवा रिप्लाय देत नाहीत. म्हणजेच त्या मुलाला इग्नोर करतात कारण त्या आधीपासूनच कोणासोबत तरी कमिटेड असतात. तुमच्या मेसेजला रिप्लाय देणं त्यांना महत्त्वाचं नाही वाटत.
३. चुकीचा मॅसेज :
चुकीचा मेसेज जर तुम्ही पाठवला किंवा काही वाईट बोललात तक मेसेजना रिप्लाय मिळणं कठीण असतं. मुलींना राग लवकर येतो आणि लवकर जात नाही. त्यामुळे काहीही मेसेज पाठवण्याआधी विचार करा.
४. समजून घेणे :
कोणाशीही मैत्री करण्यापूर्वी मुलगी तुमची अगोदर चांगली परीक्षा घेते. नवं नातं स्वीकारण्याआधी ते मुलांना समजून घेतात. त्यामुळे लगेचच मैत्री झाल्यानंतर तुमच्या मेसेजना रिप्लाय येणं जरा कठिणच असतं.
५. एकांत :
जीवनामध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्यामुळे जर मुलीच्या जीवनात एखादी वाईट गोष्ट घडली असेल तर मुलींना एकांत हवा असतो. त्यांना काही काळ ब्रेक हवा असतो. अशावेळी तुमच्या मेसेजना रिप्लाय मिळण्याची शक्यता कमी असते.
कोणालाही तुम्ही कधी जबरदस्ती करुन मिळवून शकत नाहीत. आधी मुलींना समजून घ्या त्यानंतर त्यांना देखील वेळ द्या. त्यांचा जर तुमच्यावर पूर्ण विश्वास बसेल तेव्हा त्या तुम्हाला नक्की रिप्लाय देतील किंवा नातं पुढे वाढवतील. त्यामुळे तुमच्यात आणि नात्यामध्ये समजूतदारपणा असणं खूप महत्त्वाचं असतं.