... या बाईकवर मिळतोय ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट!

नव्या वर्षात एका बाईक कंपनीनं आपल्या एका मॉडेलवर तब्बल ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट जाहीर केलाय. 

Updated: Jan 10, 2015, 03:43 PM IST
... या बाईकवर मिळतोय ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट! title=

नवी दिल्ली : नव्या वर्षात एका बाईक कंपनीनं आपल्या एका मॉडेलवर तब्बल ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट जाहीर केलाय. 

जपानची ऑटो कंपनी कावासाकीनं आपल्या झेड ८०० या बाईकची किंमत कमी केलीय. कावासाकी झेड ८०० मध्ये ८,६ सीसीचं ४ स्ट्रोक लिक्वड कूल्ड इंजिन आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या बाईकमध्ये अनेक अॅडव्हॉन्स टेक्नोलॉजी वापरण्यात आल्यात.

कंपनीनं या बाईकमध्ये इकोनॉमिकल रायडिंग इंडिकेटर आणि ईसीयू कंट्रोलेड थ्रोटल ड्युएल वॉल्वचा वापर केलाय. यामुळे इंधनाची बचत होते. 

दमदार इंजिन बाईकला पॉवर देते. कावासाकी झेड ८०० ची किंमत जवळपास ७ लाख रुपये आहे. याआधी या बाईकची किंमत जवळपास ७.९ लाख रुपये होती. ही ऑफर मार्च, २०१५ पर्यंत उपलब्ध आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.